Saturday, July 13, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023World cup 2023: पाकिस्तानचा नेदरलँड्सवर ८१ धावांनी विजय

World cup 2023: पाकिस्तानचा नेदरलँड्सवर ८१ धावांनी विजय

हैदराबाद: २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात(world cup 2023) पाकिस्तानने विजयासह आपली सुरूवात केली आहे. पाकिस्ताने नेदरलँड्ला ८१ धावांनी हरवले. पाकिस्तानच्या फलदांजीत मोहम्मद रिझवान आणि सऊद शकील यांनी अर्धशतक ठोकले. तर गोलंदाजीत हरिस रऊफने तीन विकेट मिळवल्या. ऑलराऊंडर बेस डी लीडेच्या घातक गोलंदाजी तसेच शानदार गोलंदाजी असतानाही नेदरलँडला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवता आला नाही.

पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने २८६ धावा केल्या आणि त्यानंतर गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने पहिल्यांदा खेळाना मोहम्मद रिझवान(६८) आणि सऊद शकील(६८) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २८६ धावा केल्या होत्या. याचा पाठलाग करताना नेदरलँडच्या संघाला २०५ धावा करता आल्या. नेदरलँडसाठी गोलंदाजीत चार विकेट घेणाऱ्या बेस डी लीडेने ६७ धावांची शानदार खेळी केली मात्र त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.

नेदरलँडविरुद्ध एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचा हा सलग सातवा विजय आहे. त्यांनी नेदरलँडविरुद्धचा एकही सामना गमावलेला नाही. जर वर्ल्डकपबाबत बोलायचे झाल्यास पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यातील हा तिसरा सामना होता. यात पाकिस्तानी संघाला विजय मिळाला.

याआधी गुरूवारी झालेल्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला हरवले. न्यूझीलंडने ९ विकेट राखत विजय मिळवला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -