मुंबई : सुलतान ऑफ दिल्ली (Sultan of Delhi) मधील मिलन लुथरियाच्या साकिया (saaqiya) गाण्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले असून हे त्याचं म्युजीकल पदार्पण आहे. सुमधुर संगीत त्याचा अफलातून कलाकृती आणि सुफी भावना घेऊन हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
संगीताची अनोखी आवड असलेले मिलन लुथरिया म्हणतात “मला गीताच्या जगात अनेक अद्भुत प्रतिभांसोबत काम करण्याचा बहुमान मिळाला आहे आणि माझी संगीताची आवड सर्वज्ञात आहे आणि कधी कधी मला प्रश्न पडतो की गीतकार कसा विचार करतो. जेव्हा हे गाणे तयार झाले तेव्हा मी त्याच्या सुफी भावनेच्या प्रेमात पडलो. रचना पूर्ण होण्यासाठी मी पहिली ओळ “डमी” ओळ म्हणून सुचवली. त्या रात्री विचार पुढे कसा न्यावा आणि गीतासाठी कोणाशी संपर्क साधावा असा प्रश्न पडला. मला गाढ झोप लागली. सकाळी फोन ऑन केल्यावर मला जाणवलं की मी झोपेतच गाणं लिहिलं होतं! त्यावर “स्लीप लिहीलेले” होत.”
जावेद अली यांनी गायलेल्या या गाण्याचा अंदाज नक्कीच मंत्रमुग्ध करून जाणारा आहे. सुलतान ऑफ दिल्ली या वेब सीरिज ची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. ओटीटी गाणी रिलीझ करण्याची निवड करणे ही एक अनोखी शक्कल आहे परंतु ती सुलतान ऑफ दिल्ली मध्ये हे गाणं नक्कीच वेगळं ठरणार आहे.
१३ ऑक्टोबरपासून Disney plus Hotstar वर ही वेब सीरिज स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…