मुंबई: विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा क्रिकेटर शुभमन गिल याची डेंग्यूची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे रविवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. टीम मॅनेजमेंट काही परीक्षणानंतर या स्टार फलंदाजाच्या उपलब्धतेबाबत निर्णय घेईल.
शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्याआधी आजारी पडला आहे. अशातच भारतीय संघासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, तो पहिला सामना खेळणार की नाही याबाबतची स्थिती स्पष्ट नाही आहे.
भारतीय रविवारी आपल्या विश्चचषकातील अभियानाला सुरूवात करत आहे. त्यांचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत आहे. अशातच पहिल्या सामन्यात टीम इंडिया स्टार फलंदाज शुभमन गिलशिवाय मैदानात उतरू शकते. मीडिया रिपोर्टनुसार टीम इंडियाच्या या स्टार फलंदाजाने गुरूवारी एम ए चिदम्बरम स्टेडियममध्ये टीम इंडियाच्या नेट सेशनमध्येही भाग घेतला होता. यानंतर त्याची डेंग्यूची टेस्ट करण्यात आली. यानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
टीम इंडियाचे मॅनेजमेंट सातत्याने गिलच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. शुक्रवारी आणखी एक राऊंड टेस्ट घेतली जाईल. त्यानंतर हे ठरवले जाईल की शुभमन गिल कांगांरूंविरोधात खेळणार की नाही.
कोण करणार सलामी, इशान किशन दावेदार?
दरम्यान, शुभमन गिल जर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही तर सलामीवीराची भूमिका ईशान किशनकडे दिली जाऊ शकते. तसेच यासाठी आणखीही एक दावेदार आहे तो म्हणजे लोकेश राहुल.