
नाशिक : नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकी नाका पोलिसांनी मोठी कारवाई करून एमडीची कंपनी सील केली. त्यानंतर दैनिक प्रहारने केलेल्या पाहणीत नाशिक रोड मधील अवैध धंद्याना पोलिसांचेच संरक्षण असल्याची चित्रफीत दै. प्रहारच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या अगदी समोर हा मटका अड्डा सुरु असून ते कमी की काय, या अड्डयाला चक्क पोलिसांच्या बॅरिकेट्सचे संरक्षण देण्यात आले आहे.
पोलीस ठाण्यासमोर ही अवस्था असेल तर या हद्दीत काही किमी अंतरावर एमडीचे घाऊक उत्पादन सुरु ठेवले जात असेल तर नवल ते काय?