Thursday, May 15, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Fire: मुंबईत गोरेगावमध्ये पाच मजली इमारतीला भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Fire: मुंबईत गोरेगावमध्ये पाच मजली इमारतीला भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या गोरेगाव(goregaon)परिसरातून मोठी बातमी समोर येत आहे. येथे पाच मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये गुरूवारी रात्री भयानक आग(fire brokeout) लागली. या भीषण आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर १४ जण जखमी आहेत. ३० जणांना सुखरूप वाचवण्यात यश मिळाले आहेत.


ही इमारत ग्राऊंड प्लस पाच मजल्यांची होती. इमारतीच्या पार्किंगमध्ये ही आग लागली. यात पार्किंगमधील गाड्या तसेच काही दुकाने जळून खाक झाल्या आहेत.



अग्निशमन दल घटनास्थळी दाखल


आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १०हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग कोणत्या कारणामुळे लागली याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. सध्या येथे कूलिंगचे काम सुरू आहे. स्थानिक पोलीस तसेच अग्निशमन विभागाकडून येथे आग कशी लागली याचा तपास केला जात आहे.


 


कपड्यांनी वाढवली आग


प्राथमिक अनुमानानुसार ही आग इमारतीच्या पार्किंगमध्ये लागली होती. तेथे जुने कपडे असल्याने आगीचा भडका उडाला. पाहता पाहता आग संपूर्ण पार्किंगसह दुसऱ्या मजल्यावर पोहोचली.


Comments
Add Comment