अहमदाबाद: विश्वचषक २०२३ची(world cup 2023) सुरूवात झाली आहे. पहिल्या सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात रंगत आहे. भारतीय संघानेही वर्ल्डकपसाठी आपली तयारी सुरू केली आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून भारताला सावधानता बाळगण्याची गरज आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र नुकतीच भारतीय संघाने वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला २-१ असे हरवले.
भारतीय संघ वर्ल्डकपमधील आपला पहिला सामना खेळण्यासाठी चेन्नईच्या एम ए चिदम्बरम स्टेडियममध्ये पोहोचली आहे. येथे भारताचे सर्व खेळाडू नारिंगी रंगाच्या जर्सीमध्ये दिसले. भारतीय संघाचे कोच राहुल द्रविडही त्यांच्यासोबत होते.
राहुल द्रविड संपूर्ण वर्ल्डकपमध्ये टीम इंडियासोबत असणार आहे आणि ते त्यांना गाईड करतील. नुकतेच भारतीय संघात अनुभवी स्पिनर रवीचंद्रन अश्विनला सामील करण्यात आले. त्याने अक्षऱ पटेलची जागा घेतली आहेय
भारताने २०११मध्ये शेवटचा विश्वचषक जिंकला होता. यानतर भारताला अद्याप विश्वचषक जिंकता आलेला नाही. रोहित शर्माकडे वर्ल्डकप जिंकण्याची शानदार संधी आहे.