Friday, July 19, 2024
HomeमनोरंजनSunny Leone : माधुरी दीक्षितच्या "मेरा पिया घर आया २.०" मध्ये झळकणार...

Sunny Leone : माधुरी दीक्षितच्या “मेरा पिया घर आया २.०” मध्ये झळकणार सनी लिओनी

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत असताना ती आता एक नवा कोरा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या कामाच्या चर्चा सर्वत्र असताना ती एक अफलातून गाणं घेऊन येणार असल्याचं समजतं असताना एक नवीन बातमी समोर आली आहे. बॉलीवूडच्या रसिकांना एक रोमांचक आणि आनंददायक परफॉर्मन्स बघायला मिळणार असून जेव्हा या स्रोताने हे उघड केले की माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) एकेकाळी सादर केलेला प्रसिद्ध डान्स नंबर पुन्हा तयार करण्यासाठी सनी लिओनी तयार झाली आहे. खूप अपेक्षेनंतर आता गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे हे गाणे ८ ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. हे गाणे दुसरे तिसरे कोणी नसून “मेरा पिया घर आया” आहे, जे मूळत: १९९५ च्या ब्लॉकबस्टर चित्रपट यारानामध्ये प्रदर्शित केले गेले होते.

ज्याला बॉलीवूडच्या चाहत्यांनी खूप प्रेम दिलं. आता हे गुपित उघड झाले आहे की माधुरी आणि सनी या दोघांच्याही चाहत्यांसाठी हा नॉस्टॅल्जिया ठरणार आहे.” मेरा पिया घर आया २.०” (Mera Piya Ghar Aaya) या प्रतिष्ठित गाण्यात तिच्या अप्रतिम नृत्य सादरीकरणाने सनी तिच्या चाहत्यांना मोहित करणार आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक विजय गांगुली यांनी हा डान्स कोरिओग्राफ केला आहे.

या रिमेकच्या चर्चा सगळीकडे होत असताना आता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -