Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीRanbir Kapoor : मनी लाँड्रिंग प्रकरणात रणबीर कपूरने EDला केला मेल, मागितला...

Ranbir Kapoor : मनी लाँड्रिंग प्रकरणात रणबीर कपूरने EDला केला मेल, मागितला दोन आठवड्यांचा वेळ

मुंबई: रणबीर कपूरचे(ranbir kapoor) नाव महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप मनी लाँड्रिंग प्रकरणात(Money laundering case) समोर आले होते. असे म्हटले होते की महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकर यांच्या लग्नात ते सामील झाले होते. यांच्यावर हवालाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रेटींवर पैसे देण्याचा आरोप आहे. या प्रकरणी चौकशीसाठी रणबीर कूपरला ईडीने समन्स पाठवले होते याला उत्तर देताना अभिनेत्याने मेल केला आहे.

रणबीर कपूरने महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून वेळ मागितली आहे. त्याने दोन आठवड्यांचा अवधी मागितला आहे. ईडीने रणबीर कपूरला शुक्रवारी सकाळी १० वाजता हजर राहण्यास सांगितले होते. तर रणबीर कपूरने ईडीला मेल लिहून दोन आठवड्यांची वेळ मागितली आहे. यामागे अभिनेत्याने खाजगी कारण तसेच आधीच केलेल्या कमिटमेंटचा हवाला दिला आहे.

महादेव बुक अॅप प्रमोटर सौरभ चंद्राकारचे लग्न यावर्षी फेब्रुवारीत झाले होते. त्याच्या या सोहळ्यात बॉलिवूडचे अनेक स्टार्स उपस्थित होते. सौरभचे लग्न दुबईत शाही अंदाजात झाले होते. यात तब्बल २०० कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. लग्नात अनेक स्टार्सनी परफॉर्मही केला होता.

त्यातच आता महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप प्रकरणात रणबीर कपूरचे नाव पुढे आले आहे. याशिवाय अनेक दुसरे स्टार्स जसे पाकिस्तानी सिंगर आतिफ असलम, राहत फतेह अली खान, अभिनेत्री सनी लिओनी, बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर आणि विशाल ददलानी यांचीही नावे या यादीत समाविष्ट आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -