Tuesday, August 19, 2025

Election 2023: राजस्थान-मध्य प्रदेश दौऱ्यावर जाणार पंतप्रधान, १७६०० कोटींच्या योजनांचे करणारे उद्घाटन

Election 2023: राजस्थान-मध्य प्रदेश दौऱ्यावर जाणार पंतप्रधान, १७६०० कोटींच्या योजनांचे करणारे उद्घाटन

नवी दिल्ली: राजस्थान आणि मध्य प्रदेशात येणाऱ्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदीही या कारणामुळे या दोन्ही राज्यांचा दौरा करत आहेत. पंतप्रधान मोदी गुरूवारी राजस्थानला पोहोचतील येथील अनेक विभागांच्या तब्बल ५ हजार कोटी रूपयांच्या योजनांचे उद्घाटन करतील.


सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी पंतप्रधान राजस्थानच्या जोधपूर येथे रस्ते, रेल्वे,विमान, आरोग्य आणि उच्च शिक्षण या क्षेत्राशी संबंधित ५००० कोटी रूपयांच्या विकास योजनांसाठी नारळ फोडणार आहेत. राजस्थाननंतर पंतप्रधान मोदी जबलपूरला पोहोचतील. येथे ते रस्ते, रेल्वे, गॅस पाईपलाईन, घरे, आणि स्वच्छ पिण्याचे पाणी या क्षेत्रांतील १२,६०० कोटी रूपयांपेक्षा अधिकच्या योजनांचे उद्घाटन तसेच शिलान्यास करतील.



मध्य प्रदेशात मोदींचा काय आहे कार्यक्रम


पंतप्रधान मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये पोहोचतील. येथे ते १२६०० कोटी रूपयांहून अधिकच्या योजनांचे उद्घाटन करतील. या योजना रस्ते, रेल्वे, गॅस पाईपलाई, घरे आणि स्वच्छ पिण्याचे पाणी या क्षेत्रांशी संबंधित आहेत. ते इंदौर येथे लाईट हाऊस परियोजनेंतर्गत निर्मित एक हजाराहून अधिक घरांचे उद्घाटन करतील.


पीएमओच्या माहितीनुसार व्यक्तिगत घरगुती नळ कनेक्शनच्या माध्यमातून सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाला साकार करण्याच्या दिशेने पाऊल टाकताना मंडला, जबलपूर आणि डिंडोरी जिल्ह्यात २३५० कोटी रूपयांहून अधिक जल जीवन मिशन योजनांसाठी नारळ फोडतील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा