Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023World cup 2023: कॉनवे, रचिनची शतके, इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडची विजयी सलामी

World cup 2023: कॉनवे, रचिनची शतके, इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंडची विजयी सलामी

अहमदाबाद: आयसीसी विश्वचषक २०२३मधील(world cup 2023) पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्ध विजयी सलामी दिली आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेले २८२ धावांचे आव्हान न्यूझीलंडने सहज पूर्ण करत विश्वचषक अभियानाला दमदार सुरूवात केली.

गतविजेत्या इंग्लंडने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ बाद २८२ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८३ धावांचे आव्हान होते. न्यूझीलंडने हे आव्हान केवळ एक गडी गमावत पूर्ण केले. या सामन्यात डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी शतकी खेळी करत संघाला ९ विकेट राखत मोठा विजय मिळवून दिला.

न्यूझीलंडचा विल यंग शून्यावर बाद झाल्यानंतर डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी जोरदार फटकेबाजी करत इंग्लंडच्या संघाला सळो की पळो करून सोडले. या दोघांनी २८३ धावांची भागीदारी केली. यात डेवॉन कॉनवेने जबरदस्त दीडशतकी खेळी केली. त्याने १२१ बॉलमध्ये १९ चौकार आणि ३ षटकारांसह १५२ धावा केल्या. तर रचिन रवींद्रने त्याला जबरदस्त साथ दिली. रविंद्रने ९६ बॉलमध्ये ११ चौकार आणि ५ षटकारांसह १२३ धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ विकेट गमावताना २८२ धावा केल्या होत्या. सलामीवीर जॉनी बेअरस्ट्रॉने ३३ धावा केल्या तर डेविड मलानने १४ धावांची खेळी केली. ज्यो रूटने डाव सांभाळताना ७७ धावा ठोकल्या. कर्णधार जोस बटलरने या सामन्यात ४३ धावा फटकावल्या. ज्यो रूट वगळता कोणत्याही फलंदाजाला अर्धशतक गाठता आले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -