मुंबई: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३सा आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरूवात होत आहे. विश्वचषकातील पहिला सामना आज दुपारी २ वाजल्यापासून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे.दोन्ही संघ या अभियानाची विजयी सुरूवात कऱण्याचा प्रयत्न करतील. इंग्लंडने २०१९मध्ये झालेला विश्वचषक जिंकला होता. तोच प्रयत्न इंग्लडचा संघ करेल.
वर्ल्डकपची सुरूवात आजपासून
आजपासून वर्ल्डकपच्या सामन्यांना सुरूवात होत आहे. भारत एकटा या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन करत आहे. भारतातील विविध १० शहरांमध्ये वर्ल्डकपचे सामने रंगणार आहेत. या वर्ल्डकपमधील भारताचे अभियान ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी रंगेल. त्यानंतर भारताचा बांगलादेशशी सामना होईल. तर बहुप्रतिक्षित पाकिस्तानविरुद्धचा सामना १४ ऑक्टोबरला रंगणार आहे.
इंग्लंड-न्यूझीलंड याआधी
इंग्लंडने याआधी २०१९मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे त्याच इराद्याने इंग्लंडचा संघ मैदानात उतरेल. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाला एकदाही वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंड संघासमोर मोठे आव्हान आहे. तसेच न्यूझीलंडचा संघ दुखातींमुळे कमकुवत वाटतो.
संघ
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), ज्यो रूट, जॉनी बेअरस्ट्रॉ, हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, क्रिस वोक्स, सॅम कुरेन, डेविड विली, आदिल रशीद, मार्क वुड, रीसे टॉपली, गुस एटकिंसन.
न्यूझीलंड: टॉम लाथम (कर्णधार आणि विकेटकीपर), डेवोन कोंवे, विल यंग, केन विलियमसन (पहिल्या सामन्यात खेळणार नाही), मार्क चॅपमॅन, डेरिल मिशेल, जेम्स नीशाम, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, ईश सोढी, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेनरी.