Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीBetting app case: हिना खान-कपिल शर्माला EDचे समन्स

Betting app case: हिना खान-कपिल शर्माला EDचे समन्स

मुंबई: ऑनलाईन सट्टेबाजी अॅप महादेव गेमिंग-बेटिंग अॅप प्रकरणात बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांची नावे समोर आहेत. आतापर्यंत रणबीर कपूरची या प्रकरणात चौकशी होणार होती. आता हुमा कुरेशी, कपिल शर्मा आणि हिना खान यांचीही नावे समोर येत आहेत. महादेव बेटिंग अॅप प्रकरणात तीनही सेलिब्रेटींची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. ईडी हे कधी करणार आहे याचे अपडेट समोर आलेले नाही.

हे तिघेही दुबईत झालेल्या अलिशान पार्टीत परफॉर्मन्स देण्यासाठी गेले होते. तेथे काही सेलिब्रेटींनी हे अॅप एंडॉर्स केले होते ज्यामुळे ते ईडीच्या रडारवर आले आहेत. हे अॅप लोकांना गेमिंगसाठी प्रोत्साहित करते. यात रणबीर कपूरचे नाव समोर आले आहे.

या प्रकरणात रणबीरने ईडीला मेल केला असून त्याने दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. ईडीच्या रडावर या चार सेलिब्रेटींशिवाय आतिफ असलम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, भारती सिंह, एली अवराम, सनी लिओनी, भाग्यश्री, पुलकित सम्राट, कीर्ती खरबंदास, नुसरत भरूचा आणि कृष्णा अभिषेक यांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -