टोकियो : जपानमध्ये गुरुवारी ११ वाजल्यापासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. या (Earthquake in Japan) भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.६ अशी नोंद झाली आहे. भूकंपाचे धक्के इझू बेट समुगांच्या तोरीशिमाच्या जवळ १० किलोमीटर खोल जाणवले आहेत. त्यामुळे किनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांना अलर्ट करण्यात आले आहे. त्सुनामीची भीती असल्याने त्यांना उंच ठिकाणी आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
इझू बेटावर त्सुनामीचा धोका निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इझू बेटांवर एक मीटर उंचीपर्यंतच्या त्सुनामी लाटा येण्याची शक्यता आहे. याशिवाय पूर्वेस चिबा प्रीफेक्चरपासून पश्चिमेला कागोशिमा प्रीफेक्चरपर्यंत ०.२ मीटर पर्यंतच्या लाटांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जगातील सर्वात जास्त भूकंपाचे धक्के जपानमध्ये जाणवतात. जपानमध्ये २०११ मध्ये आलेल्या भूकंपाने सर्वात मोठे नुकसान झाले होते. त्युनामीने जपानच्या उत्तर भागात मोठा विध्वंस झाला होता. या त्सुनामीमुळे फुकुशिमा आण्विक भट्टीला मोठे नुकसान झाले होते. भट्टीतील कूलिंग वॉटर रेडियोअॅक्टिव पदार्थ पाण्यात मिसळले होते.