बिजिंग : चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला असून यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
स्क्वॅश मिश्र दुहेरीत दीपिका पल्लीकल आणि हरिंदरपाल सिंग यांनी अंतिम सामन्यात मलेशियाचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावले. यामुळे भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्ण पदकाची भर पडली असून एकूण सुवर्ण पदकांची संख्या २० वर पोहचली आहे.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकल आणि हरिंदरपाल सिंग या अव्वल मानांकित भारतीय जोडीने अंतिम फेरीत द्वितीय मानांकित मलेशियाच्या जोडीचा २-० असा पराभव केला.
दीपिकाची आशियाई स्पर्धेतील कामगिरी चमकदार राहिली आहे. तिने या पर्वात आतापर्यंत भारताला २ पदके मिळवून दिली. दीपिकाने सांघिक स्पर्धेत प्रथम २ कांस्यपदक जिंकले आणि आता मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात अप्रतिम कामगिरी करत सुवर्ण जिंकले. दीपिकाचे हे एकूण सहावे पदक आहे. तिला आतापर्यंत एकाही स्पर्धेत सुवर्ण जिंकण्यात यश आले नव्हते. पण, यावेळी दीपिकाने सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केला.
याआधी दीपिका पल्लीकलने २०१० मध्ये पहिले पदक जिंकले होते. कांस्य पदक जिंकून दीपिकाने पदकांचे खाते उघडले. यानंतर २०१४ मध्ये १ रौप्य, २ कांस्य, २०१८ मध्ये १ कांस्य आणि आता तिने सुवर्ण जिंकले.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…