Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीअंबड परिसरातल्या गोडाऊनला भीषण आग, प्रचंड वित्त हानी, जीवीत हानी मात्र नाही

अंबड परिसरातल्या गोडाऊनला भीषण आग, प्रचंड वित्त हानी, जीवीत हानी मात्र नाही

सिडको : अंबड परिसरातील चुंचाळे भागात आनंदवाटीका गृहप्रकल्पाजवळ असलेल्या भंगाराच्या गोदामाला बुधवारी रात्री दोन वाजता अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका हद्दीतील सर्वच अग्निशमन केंद्रावरचे आठ ते नऊ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून सुदैवाने या आगीत कुठलीही जीवीत हानी झाली नाही. वित्त हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याचे समजते.

यावेळी अंबड सातपूर व चुंचाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -