
सिडको : अंबड परिसरातील चुंचाळे भागात आनंदवाटीका गृहप्रकल्पाजवळ असलेल्या भंगाराच्या गोदामाला बुधवारी रात्री दोन वाजता अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका हद्दीतील सर्वच अग्निशमन केंद्रावरचे आठ ते नऊ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून सुदैवाने या आगीत कुठलीही जीवीत हानी झाली नाही. वित्त हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याचे समजते.
यावेळी अंबड सातपूर व चुंचाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.