Thursday, July 25, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023World Cup 2023: काही तासातंच वाजणार विश्वचषकाचे बिगुल, जाणून घ्या सर्वकाही

World Cup 2023: काही तासातंच वाजणार विश्वचषकाचे बिगुल, जाणून घ्या सर्वकाही

मुंबई: गेले कित्येक दिवस क्रिकेट चाहते ज्याची वाट पाहत आहेत तो क्रिकेट विश्वचषक(cricket world cup 2023) अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. वनडे वर्ल्डकपचा हा १३ वा भाग आहे. भारतात आयोजित होत असलेल्या या स्पर्धेतील सामने १० विविध शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. जाणून या वर्ल्डकपबद्दल सर्वकाही…

किती संघ घेतायत भाग ?

यावेळेस वर्ल्डकपमध्ये १० संघ भाग घेत आहेत. यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि नेदरलँड्सच्या संघाचा समावेश आहे.

किती सामने खेळवले जाणार आहे आणि काय आहे फॉरमॅट?

संपूर्ण वर्ल्डकपमध्ये ४८ सामने खेळवले जाणार. सगळ्यात आधी राऊंड रॉबिन सामने होतील. या स्टेजमध्ये एक संघ बाकी ९ संघासोबत सामने खेळणार. ज्या चार संघाकडे सर्वाधिक अंक असतील ते संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील. दोन सेमीफायनल सामन्यानंतर फायनल सामना खेळवला जाईल.

कधीपासून ते कधीपर्यंत खेळवले जाणार सामने?

वर्ल्डकपचे सामने ५ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबरदरम्यान हे सामने रंगणार आहेत. यात एकूण ४६ दिवसांपर्यंत ही स्पर्धा सुरू राहील. सर्व सामने सकाळी १०.३० वाजता सुरू होतील आणि डे-नाईट सामने दुपारी २ वाजता सुरू होतील.

कोणकोणत्या ठिकाणी खेळवले जाणार सामने?

भारताच्या १० शहरांमध्ये सामने रंगणार आहेत. यात अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि धरमशाला येथे रंगणार आहेत.

रिझर्व्ह डेला ठेवला का?

दोन्ही सेमीफायनल आणि फायनल सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. निर्धारित सामन्याच्या तारखेच्या पुढील दिवशी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे.

सेमीफायनल आणि फायनल सामना कुठे रंगणार?

या स्पर्धेचा अंतिम सामना अहदमबादाच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल तर सेमीफायनलचा सामना वानखेडे स्टेडियम मुंबई आणि कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल.

कधी होणार भारत-पाकिस्तान सामना?

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता सुरू होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना रंगेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -