व्हेनिस : इटलीच्या व्हेनिसमध्ये मंगळवारी मिथेन गॅसवरून चालणारी एक बस पुलावरून कोसळली. पुलावरून बस खाली त्याला आग लागली. या अपघातात दोन मुले तसेच परदेशी व्यक्तींसह एकूण २१ जणांचा मृत्यू झाला. १८ लोक यात जखमी झाले आहेत. शहराचे महापौर लुईगी ब्रुगनारे यांनी फेसबुकवर या अपघाताची माहिती दिली.
जेव्हा प्रवाशांनी भरलेली ही बस कँपिंग ग्राऊंडच्या दिशेने जात होती तेव्हा रात्रीच्या सुमारास साडेसात वाजता एका ओव्हरपासवर यालाल अपघात झाला. बसला लगेच आग लागली. दरम्यान, या अपघाताचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासामध्ये ४० वर्षीय बस ड्रायव्हर अपघाताआधी आजारी पडला होता.
पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांनी व्यक्त केला शोक
व्हेनिस क्षेत्राचे गर्व्हनर लुका जिया यांनी सांगितले की मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या २१ आहे तर २०हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जखमी तसेच मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये केवळ इटलीचेच लोक नव्हते कर अन्य देशांच्या लोकांचाही समावेश होता.
Esprimo il più profondo cordoglio, mio personale e del Governo tutto, per il grave incidente avvenuto a Mestre. Il pensiero va alle vittime e ai loro famigliari e amici. Sono in stretto contatto con il Sindaco @LuigiBrugnaro e con il Ministro @Piantedosim per seguire le notizie…
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) October 3, 2023
१०० फूट खाली रेल्वे ट्रॅकजवळ पडली बस
इटलीच्या इल कोरिएरे डेला सेराच्या बातमीनुसार बॅरियर तोडल्यानंतर बस पुलावरून खाली कोसळली आणि १०० फूट खाली रेल्वे ट्रॅकजवळ पडली. यावेळी बसची वीजेच्या तारांशी टक्कर झाल्याने आग लागली.