Monday, May 12, 2025

देशमहत्वाची बातमी

ED Raid : 'आप'चे खासदार संजय सिंह यांच्या घरावर ईडीचा छापा

ED Raid : 'आप'चे खासदार संजय सिंह यांच्या घरावर ईडीचा छापा

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह(sanjay singh) यांच्या निवासस्थानी बुधवारी अंमलबजावणी संचलनालयाने(ईडी) छापा मारला आहे. माहितीनुसार बुधवारी सकाळी ईडीची टीम संजय सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचली. दरम्यान, ईडीने हा छापा(ED Raid) कशासंदर्भात घातला आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.


याआधीही आम आदमी पक्षाचे अनेक नेते तपास विभागाच्या रडारवर आले आहेत. ईडीने मनी लाँड्रिंग्च्या प्रकरणात गेल्या वर्षी मे मध्ये आप सरकारमधील मंत्री राहिलेले सत्येंद्र जैन यांना अटक केली होती. दरम्यान, आजारपणामुळे त्यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे.


 


याशिवाय ईडीच्या दिल्ली दारू घोटाळा प्रकरणा्या आरोपात सीबीआयने या वर्षी फेब्रुवारीमध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. यानंतर दारू घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा तपास करणाऱ्या ईडीने त्यांना अटक केली होती. सिसोदिया सध्या जेलमध्ये कैदेत आहेत.

Comments
Add Comment