
मुंबई : नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील दुर्घटनेप्रकरणी (Nanded death case) आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
#LIVE | मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद.... https://t.co/h4SM9TXIXe
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 3, 2023
२४ तासांत येथे ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात औषधांचा पुरवठा होत नसल्याने गंभीर समस्यांनी ग्रासलेल्या रुग्णांना जीव गमवावा लागला, असा आरोप होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधी नेत्यांनी केली आहे.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ही घटना राज्य सरकारने गांभीर्याने घेतली आहे. संबंधितांना सूचना दिल्या आहेत. संबंधित मंत्री घटनास्थळी गेले आहेत. या बाबतीत प्राथमिक माहिती घेतली असता रुग्णालयात औषधांचा साठा होता. औषध खरेदीसाठी आधीच १२ कोटी रुपये दिले आहेत. रुग्णालयात औषधांचा जास्तीचा साठा होता. डॉक्टर आणि स्टाफ देखील होते.
झालेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी होईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल. मृत्यू झालेल्यांमध्ये काही वयोवृद्ध लोक होते. अपघात केस होत्या. काही लहान मुलं होती. ज्यांचे वजन कमी होते. अहवाल आल्यावर मी सविस्तर बोलेन, असे एकनाथ शिंदे म्हणाले.