मुंबई : गणेशोत्सवानंतर आता सर्वत्र नवरात्रीचे (Navratri) वेध लागले आहेत. गरबा (Garaba) आणि दांडिया नाईट्ससाठी (Dandiya Nights) आतापासूनच तयारीला सुरुवात झाली आहे. तर देवीही मखरात बसण्यासाठी सज्ज झाली आहे. यंदा १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेचा (Ghatsthapana) मुहूर्त आहे. वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये देवीच्या मूर्तीचे रंगकाम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. देवीच्या आगमनासाठी विविध सार्वजनिक मंडळेही उत्सुक झाली आहेत.
गणेशोत्सवाप्रमाणेच महाराष्ट्रात नवरात्रही विशेष लोकप्रिय आहे. नवरात्रीचे नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते तर काही भाविक श्रद्धेपोटी नऊ दिवस उपवासदेखील करतात. गुजरातमध्ये खेळला जाणारा गरबा आणि दांडिया हा प्रकारही महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. तसेच नवरात्रीतील नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांचे कपडे त्या त्या दिवशीच्या रंगांप्रमाणे घातले जातात. यामुळे एक सामाजिक एकीही दिसून येते.
यंदाही देवीच्या आगमनासाठी तयारी केली जात आहे. देवीच्या सुंदर आणि सुबक मूर्ती कार्यशाळांमधून तयार केल्या जात आहेत. अशाच मुंबईतील अनंत बंगाल यांच्या श्री गणेश आर्ट येथील कार्यशाळेत आमचे छायाचित्रकार अरुण पाटील यांनी फेरफटका मारला. तेथील देवीच्या मूर्तींची ही झलक खास प्रहारच्या वाचकांसाठी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…