Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

Maharashtra Rain: पुढील २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain: पुढील २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: राज्यात पुढील २४ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस(rain) पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे उपनगरसह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.

या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

मंगळवारी मुंबई, पुणे, ठाणे, कोकण तसेच पालघर या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ, मध्यमहाराष्ट्रासह अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

बांगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात कोकण तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे अनेक ठिकाणच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्यात पावसाने आपल्या परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी त्याचा जोर वाढलेला दिसत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >