
होंगझाऊ: आशियाई स्पर्धा २०२३मध्ये(asian games 2023) भारतीय कबड्डी संघाने(indian kabaddi team) आपल्या अभियानाची दमदार विजयी सुरूवात केली आहे. पहिल्याच सामन्यात त्यांना बांगलादेश संघाचे आव्हान मिळाले होते. या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशला ३७ गुणांच्या अंतराने हरवले. भारताने बांगलादेशला ५५-१८ असे हरवले.
भारतीय कबड्डी संघाने पहिल्यापासूनच बांगलादेशवर आपले वर्चस्व ठेवले होते. भारतीय रेडर्सनी जबरदस्त रेड करत सुरूवात केली. नवीन आणि अर्जुन देसवाल यावेळी खूप आक्रमक दिसले. या दोघांनी एकामागोमाग एक बांग्ला डिफेन्सला जेरीस आणले. दुसरीकडे भारताच्या डिफेन्सनेही बांगलादेशच्या रेडर्सना टॅकल केले. पवन सहरावत, सुरजीत आणि असलम इनामदार प्रभावी खेळ करताना दिसले.
पहिल्या हाफमध्ये भारताने बांगलादेशविरुद्ध १९ गुणांची आघाडी घेतली होती. हाफ टाईमपर्यंत हा स्कोर २४-९ असा होता. दुसऱ्या हाफमध्ये भारताने ३१ गुण मिळवले आणि शेवटी हा सामना ५५-१८ असा जिंकला.