
होंगझाऊ: आशियाई स्पर्धा २०२३मध्ये(asian games 2023) भारताचे खेळाडू जबरदस्त कामगिरी करत पदकांवर शिक्कामोर्तब करत आहे. दहाव्या दिवशी भारताने आतापर्यंत ६९ पदके मिळवली आहेत. यात १५ सुवर्ण, २६ रौप्य आणि २८ कांस्य पदकांचा समावेश आहे.
भारताची अॅथलीट पारूल चौधरीने मिळवले सुवर्णपदक
भारताची खेळाडू पारूल चौधरीने सुवर्णपदक पटकावले. पारूल चौधरीने ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
थाळीफेकमध्ये भारताला सुवर्णपदक
थाळीफेकमध्ये भारताच्या अनूराणीने इतिहास रचला. अनु राणीने थाळीफेकमध्ये सुवर्णपदकावर कब्जा केला. तिने ६२.९२ मीटर थ्रो करत पहिले स्थान मिळवले.
डीकॅथलॉनमध्ये तेजस्विन शंकरला रौप्य
तेजस्विन शंकरने रौप्यपदक पटकावले. सोबतच डीकॅथलॉन मेंस नॅशनल रेकॉर्ड तोडला आहे. भारताला तब्बल ४९ वर्षांनी आशियाई स्पर्धेत डीकॅथलॉनमध्ये पदक मिळाले आहे. याआधी भारताने शेवटचे १९७४मध्ये आशियाई स्पर्धेत पदक जिंकले होते.
बॉक्सर नरेंद्रला कांस्यपदक
भारताचा बॉक्सर नरेंद्रला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ९२ किलो वजनी गटातील सेमीफायनलमध्ये नरेंद्रला पराभवाचा सामना करावा लागला. सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्याने त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.