Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीनांदेड हादरले! शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ जणांचा मृत्यू

नांदेड हादरले! शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ जणांचा मृत्यू

मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश

नांदेड : नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे यात १२ नवजात बालकांचा समावेश आहे.

रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून, वेळेवर औषधांचा पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप केला जात आहे. हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.

याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने प्रतिक्रिया दिली असून, या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांमध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता असा दावा केला आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे

दरम्यान नांदेड येथील घडलेल्या घटनेच्या संदर्भात चौकशी समिती नेमली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. सोबतच आपण स्वतः रुग्णालयात जाऊन पाहणी करणार असल्याचे देखील मुश्रीफ म्हणाले. तसेच, “हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे हे चौकशी केल्याशिवाय समजणार नाही. आमचे आयुक्त तत्काळ आजच तिकडे निघणार आहेत. तसेच मी देखील उद्या जाऊन सर्व घटनेचा आढावा घेणार असल्याचे,” मुश्रीफ म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -