Monsoon Updates : मान्सून चालला रजेवर... पुढील आठवड्यात सुरु होणार परतीचा पाऊस

  1473

राज्यातील नऊ जिल्ह्यांत पाण्याविना लोकांचे हाल...


मुंबई : मुंबईत यंदा जून महिना उजाडायच्या आतच पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मात्र काहीसा रेंगाळतच पाऊस बरसत होता. असं असलं तरी मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता पावसाने मिटवली आहे. मात्र राज्यातील काही जिल्हे शेवटपर्यंत पावसाच्या प्रतिक्षेतच राहिले. या आठवड्याच्या शेवटी मान्सून रजेवर जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आधीच चिंतेत असणार्‍या बळीराजाला आता आणखी वर्षभराच्या चिंतेने ग्रासले आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांत पावसाने गैरहजेरी लावल्याने तिथे पाण्याविना लोकांचे हाल होत आहेत.


राज्यातून नैऋत्य मान्सून आठवड्याच्या शेवटी माघारी फिरण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. १० ऑक्टोबरनंतर मान्सून माघारी फिरण्याचा अंदाज व्यक्त हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात एकूण सरासरीच्या ९७ टक्के पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.


दरम्यान, राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. सांगली, सातारा, सोलापूर, हिंगोली, जालना, अकोला, अमरावती, बीड, उस्मानाबाद या ९ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी नोंदवण्यात आले आहे. याउलट राज्यातील मुंबईसह उपनगरांत, ठाणे, पालघर आणि नांदेडमध्येही सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.



राज्यात या ९ जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट :-


सांगली : दरवर्षी सरासरी ४८६.१ मिमी पावसाची नोंद होते. मात्र यंदा २७२.७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे सांगलीत यावर्षी ४४ टक्के पावसाची तूट आहे.


सातारा : सरासरी ८४४.६ मिमी पाऊस होत असताना यंदा ५३५.६ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे ३७ टक्के पावसाची तूट आहे.


सोलापूर : सरासरी ४५८.१ मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र यंदा फक्त ३१९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोलापुरात ३० टक्के पावसाची तूट आहे.


जालना : सरासरी ५९१.८ मिमी पाऊस होतो. मात्र यंदा ३३ टक्के पावसाची तूट असून ३९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.


बीड : सरासरी ५५७.४ मिमी पाऊस होत असतो, मात्र यंदा ४३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बीडमध्ये २१ टक्के तूट आहे.


उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये सरासरी ५७९.६ मिमी पावसाची नोंद होत असते. प्रत्यक्षात ४४२.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा २४ टक्क्यांची तूट आहे.


हिंगोली : ५८३.८ मिमी पावसाची नोंद झाली असून ती सरासरीपेक्षा २३ टक्के कमी आहे.


अकोला : सरासरी ६९४.२ मिमी पाऊस होत असतो. प्रत्यक्षात ५३२.९ मिमी पाऊस झाला आहे. २३ टक्के पावसाची तूट आहे.


अमरावती : सरासरी ८२२.९ मिमी पाऊस होतो. यंदा ६०४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अमरावतीत २७ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई