Tuesday, May 6, 2025

ताज्या घडामोडीनाशिक

Pitrupaksha : पितृ पक्षावर महागाई, दुष्काळाचे सावट

Pitrupaksha : पितृ पक्षावर महागाई, दुष्काळाचे सावट

पंगत होतेय नजरे आड


खामखेडा : सध्या पितृपक्षाचे (Pitrupaksha) दिवस, पितृ पंधरवडा असल्याने वाढत्या मागणीमुळे भाजीपाल्याचे दर तेजीत आहेत.


मराठी महिन्यातील भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाचे आगमन होते. या पंधरा दिवसाच्या कालावधीत मृत झालेल्या घरातील वाडवडील आई, भाऊ, काका, काकू, आदी आप्तांचे श्राद्ध करावे लागते. या श्राद्धाच्या नैवद्यासाठी कारले, गिलके, दोड़के, गवार, चवळी, चक्की, आळुचे पान, आदि भाजीपाला महत्वाचा मानला जातो. गोड नैवद्य म्हणून गव्हाची खीर, कड़ी, भात असे पक्वान्न हमखास असते. करावे लागते.


या जेवणासाठी भाऊबंद, नोकरी निमित्ताने बाहेर गावी असलेले कुटुंबीय, सगे-सोयरे, मित्र यांना विशेष निमंत्रण असते. एकूणच पितृपक्षात पूर्वजांच्या स्मरणात पंगत उठविण्याची रीत आहे.


यंदा मात्र ही रीत गेल्या दोन वर्षाप्रमाणेच खंडीत झाल्याचे दिसते. दोन वर्षांपूर्वी आलेल्या महामारीने गर्दीला अटकाव बसल्याने घरातल्या घरातच श्राद्ध घातले गेले. तर यंदा वाढलेली महागाई त्यात पिक पाणी नाही, दुष्काळ सदृश्य परिस्थिती, यामुळे खर्चाला फाटा देण्याकडे कल दिसत असल्याने अपवाद वगळता श्राद्धाच्या पंगतीही नजरे आड होत आहेत.

Comments
Add Comment