
माडे यांचा अतिरिक्त कारभार काढला, कर्मचारी नसल्यास कार्यालय बंद
मालेगाव : मालेगाव शहरात सुरु आलेल्या ‘लँड जिहाद’वर आ. नितेश राणे यांनी घेतलेली भूमिका आणि दै. प्रहारने प्रसिद्ध केलेले वृत्त यांचा एकत्रित परिणाम म्हणून मालेगाव दुय्यम निबंधक दोनचा अतिरिक्त पदभार माडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. या जागेवर कर्मचारी उपलब्ध न झाल्यास हे कार्यालय बंद ठेवले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मालेगाव मधील काही अभ्यागतांची सामाजिक मानसिकता अतिशय आक्षेपार्ह असून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे, शिवीगाळ करणे, दगडफेक करणे यासारखे प्रकार घडत असल्याने या ठिकाणी काम करण्यास कुणी धजावत नसल्याची प्रतिक्रिया मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवांगे यांनी दै. प्रहारला दिली होती.