वाडा : वाडा ग्रामीण रुग्णालय, वाडा बस स्थानक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गे पंचायत समिती, तहसील कार्यालय व पोलीस ठाण्याच्या परिसरात सोमवारी (दि २ ऑक्टोबर) स्वच्छता अभियान आयोजित करून सर्व परिसर स्वच्छ केला. गवंडी बांधकाम मजुर व जनरल कामगार संघटना, रूग्णमित्र सामाजिक व शैक्षणिक संस्था, साथमित्रांची साथ व पेंटर कामगार संघटनेच्या वतिने राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबविण्यात आला.
वाडा ग्रामीण रुगणालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वाडा ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डाॅ. दासरे, वाडा गावच्या पोलिस पाटील नंदा बोरकर, दक्षता कमिटी सदस्य मंदाताई कांबळे, गवंडी बांधकाम मजुर व जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष भिमराव बागूल, खजिनदार गणपत कामडी, सचिव मंगेश डगले, उपाध्यक्ष यशवंत भोईर, सदस्य गजाभाऊ भोईर, सुनिल कुमावत, सुनिल गवारी, शाम जिल्हा, जिल्हा संघटक राजेंद्र नाना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास चोधरी, शहर प्रमूख संजय पडवळ, उपाध्यक्ष शहर उमाकांत पाटील, महिला तालुकाध्यक्ष मेघना बागूल, उपाध्यक्ष साक्षी माईन, आशा चौरे, पुष्पा बागूल, रूपाली बागूल, साथमित्राची साथ संस्थेचे अध्यक्ष सचिन गोळे, गाध्रे गावचे सरपंच रविंद्र खाजोडे, संदिप भोमटे, पेंटर कामगार संघटनेचे अध्यक्ष रूपेश पाटील, खजिनदार शशिकांत गडगे, हरोसाळे विभागचे कमलाकर कोरडे, डाहे विभागाचे प्रमुख कविता कोंढारी, दर्शना काकड, फडवले मावशी, गणेश सूतार, इलेक्ट्रॉनिक शाखाचे नदिम शेख, निलेश आगिवले, राकेश जाधव, सदस्य अनिकेत देवळे, मनोज भोमटे, संदीप देवळे, तुषार डवळा, साहिल शिरविंदे, राजेश भोमटे आदी उपस्थित होते.
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…
मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…