
फसगत करणार्या यानी वू चा व्हिडीओही आला समोर.. पाहा कसे फसवले
हांगझोऊ : आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian games 2023) पातळीवर अनेक खेळाडू आपलं नशीब आजमावत असतात. पण या पातळीवरही यजमान पद असलेल्या चीनकडून चीटिंग व्हावी ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे. आज चीनच्या हांगझोऊ मध्ये सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत चीनच्या यानी वू (Yanni wu) हिला १०० मीटर हर्डल स्पर्धेत रौप्यपदक देण्यात येणार होते. याच स्पर्धेत भारताच्या ज्योती याराजी (Jyothi Yarraji) या खेळाडूला कांस्यपदक मिळाले होते. मात्र, ज्योतीने यानी वू ची चूक परिक्षकांच्या निदर्शनास आणून दिली आणि रौप्यपदक आपल्या नावावर केले.
महिला १०० मीटर हर्डल रेसमध्ये चीनची यानी वू हिने वेळेच्या काही सेकंद आधीच धावण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला ही बाब कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र, त्यामुळे ती धावण्यात दुसर्या क्रमांकावर आली आणि परिक्षकांनी तिला रौप्यपदक जाहीर केले. भारताच्या ज्योतीला कांस्यपदक जाहीर करण्यात आले. पण आधीच चौफेर लक्ष असणार्या ज्योतीने चीनच्या खेळाडूचा डाव परिक्षकांच्या निदर्शनास आणून दिला. यावर चीनची यानी वू मात्र ज्योतीवरच आरोप करु लागली. ज्योतीनेच चुकीची सुरुवात केली, असे आरोप ती करत होती. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.
परिक्षकांनी चीनच्या यानीचे म्हणणे खरे ठरवत ज्योतीला स्पर्धेतून बाद केले. पण सत्याची कास सोडायची नाही आणि आपल्या हक्काचं मिळवायचंच, ही भारताची शिकवणच आहे. ज्योतीने या शिकवणीप्रमाणे मैदान सोडले नाही आणि ती आपल्या बोलण्यावर ठाम राहिली. त्यामुळे खेळाचा रिप्ले पाहण्यात आला. यात चीनची यानीच वेळेच्या काही सेकंद अगोदर उठल्याचे दिसून आले. त्यामुळे परिक्षकांनी यानीला खेळातून बाद केले, तिच्याविरोधात कारवाई करण्यात आली व ज्योतीला रौप्यपदक देण्यात आले.
भारताची आशियाई स्पर्धेत दमदार कामगिरी सुरु आहे. आतापर्यंत ५५ पदकांची कमाई करत भारत चौथ्या स्थानावर स्थिरावला आहे. पहिल्या स्थानावर असणार्या चीन आणि भारताच्या एकूण पदक संख्येत कमालीचा फरक असला तरी चीटर चीनचा १०० मीटर हर्डल स्पर्धेतील रडीचा डाव भारताच्या ज्योती याराजीने हाणून पाडला आहे. सुरुवातच चुकीची करणार्या यानी वू ची चोरी ज्योतीमुळे पकडली गेली. याबद्दल ज्योतीचा सर्व भारतीयांना कायम अभिमान राहील.
It's a shame that such injustice is being doing to an indian athlete at an international event like the Asian games 2023! The Shameless Chinese home favouriteism clearly showcased.
What a mental trauma & distractio it would have caused Jyothi yarraji.. #AsianGames… pic.twitter.com/BPgr2hY7dv
— Alisha abdullah (@alishaabdullah) October 1, 2023
Crazy scenes!
Chinese player accusing Jyothi Yarraji after being accused of a False Start!#IndiaAtAsianGames #AsianCup2023 #19thAsianGames #Athletics pic.twitter.com/jSt9gdUyfa
— CrowdVerdict (@CrowdVerdict) October 1, 2023