
संशयिताचे छायाचित्र व्हायरल,पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन
येवला : अंगावर टोमॅटो सॉस टाकून महिलेच्या हातातील रोख रकमेची बॅग चोरट्याने लंपास केल्याची घटना येवला शहरात घडली आहे.रविवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार येवला शहरातील जुना कोर्ट रोड परिसरामध्ये ही घटना घडली.
शालिनी वालतुरे यांच्या वडिलांचा अपघात काही दिवसांपूर्वी झाला होता.उपचारासाठी घेतलेले उसणवारीचे ५७ हजार रुपये स्टेट बँकेतून काढून त्या घरी परतत असताना बँकेच्या बाहेर आल्यानंतर एका भामट्याने त्यांना सांगितले की तुमच्या अंगावर काहीतरी घाण पडलेली असल्याचे या महिलेला सांगितले.
ही महिला शनि पटांगण परिसरातील स्टेट बँकेतून कोर्ट रोड परिसरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कपड्यावर पडलेली घाण साफ करण्यासाठी थांबले असता फुटेज मध्ये दिसणाऱ्या भामट्याने गाडी स्कुटी गाडीवर ठेवलेली ५७ हजार रुपयांची बॅग, दोन ग्राम सोने आणि अंदाजे १५ हजारांचे चांदीचे दागिने, तसेच २२ हजार रुपयांचा मोबाईल असा रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला हे लक्षात आले .
हा भामटा चोर स्टेट बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला सून येवला शहर पोलीस आता या चोरट्याचा शोध घेत आहे. दरम्यान सीसीटीव्ही मध्ये दिसत असल्यास चोरट्या संदर्भात कोणालाही काही माहिती असल्यास तात्काळ येवला शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.