Gautami Patil : सबसे कातील... गौतमी पाटील येतेय ‘घुंगरू’ घेऊन...


  • ऐकलंत का! : दीपक परब


सध्या एकच नाव, सर्वांना हाय ठाव... ते म्हणजे, सबसे कातील गौतमी पाटील. आपल्या आगळ्यावेगळ्या भन्नाट आणि घायाळ करणाऱ्या नृत्य-अदाकारीने गौतमीने जणू सर्वांनाच वेड लावले आहे. ती आता रूपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली असून गौतमीचा ‘घुंगरू एक संघर्ष’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तिचे अगणित चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढच्या महिन्यात होणार प्रदर्शित होणार आहे. गौतमीच्या ‘घुंगरू’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. हा सिनेमा पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून लवकरच त्याची तारिख जाहीर करण्यात येणार आहे. राज्यभरात गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या कातील नृत्य अदांनी गौतमीने तरुणाईला घायाळ केले आहे. या गौतमीला रुपेरी पडद्यावर डोळे भरून पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


लोककलावंतांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असून गौतमीसाठी हा सिनेमा खूपच खास आहे. ‘घुंगरू’त प्रेक्षकांना लोककलावंतांचे खडतर आयुष्य, त्यांचा संघर्ष, प्रेमकथा, रहस्यमय बाबी अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अनेक नवोदीत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खूर्चीला बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल, असे म्हटले जात आहे. सिनेमाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. गौतमीचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले आहे. या सिनेमात गौतमी आणि बाबा गायकवाड हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासह सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळीदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे सोलापूर, माढा, हम्पीसह परदेशातही या सिनेमाचे शूटिंग झाले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Comments
Add Comment

विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला खोल जखम

नोंद-भागा वारखडे देशात दर वर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतात. हे स्वप्न केवळ करिअरचे नसते, तर

मुमुक्षु : पटलावरचा प्रवास

इतिहासाच्या पाऊलखुणांनी आणि पराक्रमाच्या गाथांनी पावन झालेल्या या भूमीचा वारसदार असणं, यासारखं थोर भाग्य नाही.

मौनम् सर्वार्थ साधनम् ।

संवाद-गुरुनाथ तेंडुलकर ही कथा आहे १७व्या दशकातील... त्यावेळी रशियामध्ये झार निकोलस नावाचा राजा राज्य करीत होता.

नरक आणि नरक यातना

महाभारतातील मोतीकण -  भालचंद्र ठाकूर पृथ्वीवरील जीव अनेक प्रकारची कर्मे करतो. कर्माचेही सात्त्विक राजस व तामस

‘कोकणात आहे माहेर माझं...’

नॉस्टॅल्जिया -श्रीनिवास बेलसरे काळ होता ६०च्या दशकातला म्हणजे आजपासून सुमारे ६५ वर्षांपूर्वीचा! भौतिक प्रगती

अधिक मास : आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पर्व

स्मृतीगंध-लता गुठे आजही ग्रामीण भागामध्ये ‘अधिक मासा’ला विशेष महत्त्व दिले जाते. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण,