Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजGautami Patil : सबसे कातील... गौतमी पाटील येतेय ‘घुंगरू’ घेऊन...

Gautami Patil : सबसे कातील… गौतमी पाटील येतेय ‘घुंगरू’ घेऊन…

  • ऐकलंत का! : दीपक परब

सध्या एकच नाव, सर्वांना हाय ठाव… ते म्हणजे, सबसे कातील गौतमी पाटील. आपल्या आगळ्यावेगळ्या भन्नाट आणि घायाळ करणाऱ्या नृत्य-अदाकारीने गौतमीने जणू सर्वांनाच वेड लावले आहे. ती आता रूपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली असून गौतमीचा ‘घुंगरू एक संघर्ष’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तिचे अगणित चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढच्या महिन्यात होणार प्रदर्शित होणार आहे. गौतमीच्या ‘घुंगरू’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. हा सिनेमा पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून लवकरच त्याची तारिख जाहीर करण्यात येणार आहे. राज्यभरात गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या कातील नृत्य अदांनी गौतमीने तरुणाईला घायाळ केले आहे. या गौतमीला रुपेरी पडद्यावर डोळे भरून पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लोककलावंतांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असून गौतमीसाठी हा सिनेमा खूपच खास आहे. ‘घुंगरू’त प्रेक्षकांना लोककलावंतांचे खडतर आयुष्य, त्यांचा संघर्ष, प्रेमकथा, रहस्यमय बाबी अशा अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अनेक नवोदीत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खूर्चीला बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल, असे म्हटले जात आहे. सिनेमाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. गौतमीचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले आहे. या सिनेमात गौतमी आणि बाबा गायकवाड हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासह सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते ही कलाकार मंडळीदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे सोलापूर, माढा, हम्पीसह परदेशातही या सिनेमाचे शूटिंग झाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -