Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजMarket : आदिवासींसाठी हवी हक्काची बाजारपेठ

Market : आदिवासींसाठी हवी हक्काची बाजारपेठ

  • विशेष : सुनीता नागरे

श्रावण महिना सुरू झाला की, विविध सणांची चाहूल लागते. भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण भाद्रपद महिन्यात धार्मिक पूजा विधींसाठी, रान वनस्पतीची फुले पाने यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसाजसा शहरी भाग विस्तारित होत गेला तशा घराच्या आवारातील अंगणातील पूजेसाठी लागणारी पाने, फुले त्यांच्या आवारातून हद्दपार झाली. हीच गोष्ट आदिवासी बांधवांनी हेरली आणि आदिवासी बांधवांकडून ही सामग्री शहरातील विविध ठिकाणी उपलब्ध करून त्यातून रोजगार मिळवण्यास सुरुवात झाली. धार्मिक पूजेसाठी फुले, पाने, हार, तोरण, पत्री, रान वनस्पती, तरडे यांच्यासारख्या विविध वस्तूंची गरज लागते. मात्र या वस्तू शहरांमध्ये सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे गडचिरोली, नाशिक, इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर ठाणे, मोखाडा, पालघर, रायगड, अशा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आदिवासी बांधव या जंगलांमधून रानभाज्या, रान वनस्पतीची पाने, फुले, घेऊन शहरी भागांमध्ये विक्री करण्यासाठी येतात.

आदिवासी बांधवांकडे जमीन कमी असल्याकारणाने व त्यातच जिरायती पट्टा असल्याकारणाने आदिवासी बांधव वर्षभर स्थलांतर करत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. श्रावण ते भाद्रपद हा मागणीचा काळ श्रावण महिन्यात नागपंचमीला नाग पूजनासाठी, आघाड्याची पाने रंगीबेरंगी करड्याची फुले आणि हराळी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत आणली जाते. गौरी गणपतीच्या दिवसांमध्ये पूजा व नैवेद्यासाठी लागणाऱ्या अनेक रान वनस्पती फुले व भाज्यांना विशेष महत्त्व असते यासह हरतालिका ऋषीपंचमीसाठी पत्री आघाड्याची पाने आणि काड्या लागतात. ऋषिपंचमीला साधारण एकवीस भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामध्ये चाळीचा मोहोर, तुळशीचा मोहोर, कर्टुलीची फळे, श्रीची फुले, कर्णचा पाला, माठाची कोवळी पाने या भाज्यांना विशेष महत्त्व असते. या रानभाज्या जंगलातून संकलित करून बाजारपेठेत विक्रीसाठी येतात. श्रावणापासून ते थेट गणपती-दसरा दिवाळी पर्यंत सुरू होणारे सण आदिवासी बांधवांसाठी हंगामी रोजगार ठरत आहे असून रानभाजा पाना फुलांमधून आदिवासी बांधवांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.

मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा बोरवली नॅशनल पार्क, गोराई, गोरेगाव पूर्व आरेमध्ये आदिवासी बांधव जंगलातील भाजी, पाने, फुले यांचे संकलन करून विकतात. आरेमध्ये जेव्हा हे आदिवासी बांधव भाजी विकण्यास बसतात, तेव्हा तेथील शासकीय अधिकारी त्यांना भाजीपाले फुले विक्रीसाठी मनाई करतात. त्यामुळे त्यांना बाजारपेठेसाठी विविध ठिकाणी भाजीपाला घेऊन फिरावे लागते.

मुंबईच्या बाहेरील आदिवासी बांधवांना त्यांच्या जंगलातील भाजीपाला, पाणी, फुले विक्रीसाठी शहरामध्ये पोहोचेपर्यंत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मुंबई बाहेर आदिवासी बांधव रात्रभर ट्रेनमधून प्रवास करत मुंबईमध्ये त्यांचा रानभाज्या रानफुले आणून विकतात. आदिवासी बांधव यांना रानभाज्या, पाणी, फुले यांचे गुणधर्म माहीत असतात. ते आपल्या शरीरासाठी किती गुणवर्धक आहे हे महत्त्व फायदे ग्राहकांना पटवून देण्यामध्ये यशस्वी ठरतात. श्रावण ते पितृपक्षदरम्यान रानकेळीची पाने, प्रसाद ठेवण्यासाठी वापरली जातात. रानवनस्पती फुलांचे संकलन करून विविध जिल्ह्यातून आदिवासी बांधव विक्रीसाठी आणतात विक्रीसाठी आणतात यातून त्यांना चांगला रोजगारही उपलब्ध होतो. या सर्व भाज्या फुले यांचे संकलन करण्यासाठी जंगलामध्ये ४ ते ५ किलोमीटर पायी फिरावे लागते; परंतु एवढे काबाडकष्ट करूनसुद्धा त्यांना त्यांच्या मेहनतीचा पूर्ण मोबदला मिळत नाही. घेताना ग्राहक सुद्धा भावामध्ये घासाघीस करतो. जसा शासनाने आठवडे बाजार ठिकठिकाणी सुरू केला आहे, त्याप्रमाणे आदिवासी बांधवांसाठी सरकारने विविध स्तरांवर त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -