Tuesday, July 2, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणMaharashtra Monsoon: राज्यात या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

Maharashtra Monsoon: राज्यात या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

मुंबई: गणेशोत्सवानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा(monsoon) जोर वाढला आहे.राज्याच्या अनेक भागांमध्ये दोन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यालगत अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे दक्षिण कोकण, गोवा येथे पुढील २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान यावेळेस पावसासोबत वाऱ्याचा वेगही अधिक असणार आहे. त्यामुळे येथे वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट व्यक्त केला आहे.

मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस

मुंबईतही हवामान विभागाने मध्यम स्वरूपाचा पाऊश कोसळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढलेला दिसू शकतो.

परतीचा पाऊस

राज्यात ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबरदरम्यान मान्सून परतणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -