Monday, May 12, 2025

देशताज्या घडामोडी

Bus Accident: तामिळनाडूत बस दरीत कोसळली, ८ जण मृत्यूमुखी

Bus Accident: तामिळनाडूत बस दरीत कोसळली, ८ जण मृत्यूमुखी

चेन्नई: तामिळनाडूच्या(tamilnadu) निलगिरी जिल्ह्यात कुन्नूरजवळ एक पर्यटकांनी भरलेली बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार दोन ड्रायव्हरसह ५९ प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही बस दरीत कोसळली. ही बस कुन्नूर येथून तेनकासी येथे जात होते. या बसमधील पर्यटक फिरण्यासाठी उटीला आले होते तेथून ते घरी परतत होते.



असा घडला अपघात


हेअरपिन वळण असलेल्या रस्त्यावर प्रवास करताना अचानक बस दरीत कोसळली, अपघाताची बातमी कळताच स्थानिक अधिकारी तसेच इतरांनी धाव घेतली. ज्या प्रवाशांना वाचवण्यात आले त्यातील ८ जणांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.



अनेक प्रवासी जखमी, काही गंभीर


या प्रवासात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत तर काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी या घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना २ लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली.



मृतांमध्ये चार महिला, एका अल्पवयीनाचा समावेश


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये चार महिला आणि एका अल्पवयीनाचा समावेश आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment