Thursday, July 10, 2025

Asian Games 2023:महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळेने रचला इतिहास, स्टीपलचेसमध्ये भारतासाठी जिंकले सुवर्णपदक

Asian Games 2023:महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळेने रचला इतिहास, स्टीपलचेसमध्ये भारतासाठी जिंकले सुवर्णपदक

होंगझाऊ: रेकॉर्डतोड कामगिरी करणाऱ्या अविनाश साबळेने(avinash sabale) आशियाई स्पर्धेत(asian games 2023) पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. २९ वर्षीय साबळेने होंगझाऊ येथील आशिया चषकात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने ८.१९.५० सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. त्याने ८.२२.७९ सेकंदाचा आशियाई स्पर्धेचा रेकॉर्ड तोडला.



बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक


बॅडमिंटन खेळात भारताला रौप्य पदक मिळाले आहे. अंतिम सामन्यात भारताचा चीनकडून ३-२ असा पराभव झाला. सामन्यात भारताने सुरूवातीचे २ गेम जिंकत २-० अशी आघाडी घेतली होती. मात्र शेवटचे ३ गेममध्ये पराभव झाल्याने त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.



थाळीफेकमध्ये सीमा पुनियाला कांस्यपदक


भारताच्या सीमा पुनियाने थाळीफेकमध्ये कांस्यपदक पटकावले. तिने ५८.६२ मीटर दूर थाळी फेक केली आणि कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले.



गोळाफेकमध्ये तेजिंदर पालची सुवर्ण कामगिरी


आशियाई स्पर्धेत भारताच्या तेजिंदर पालने गोळाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्याने याआधीच्या आशियाई स्पर्धेतही सुवर्णपद जिंकले होते. त्याचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे.

Comments
Add Comment