‘जवान’ बनण्यासाठी स्वतःची कंपनी विकली
वॉशिंग्टन : तरुण दिसण्यासाठी एका तरुणाने केलेले प्रयत्न पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. वाढते वय हे अनेकांसाठी धोक्याची घंटा असते. वयाच्या खुणा चेहऱ्यावर दिसू नयेत यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्वचा व शरीर चिरतरुण ठेवण्यासाठी आहारात बदल केले जातात तर अनेक गोळ्या किंवा औषधे घेतले जातात. अमेरिकेतही असाच एक प्रकार समोर आला आहे. अमेरिकेतील एका करोडपती उद्योजकावर (Brian Johnson) तरुण दिसण्याचा असं काही वेड लागलं आहे की दिवसाला तो १११ गोळ्यांचे सेवन करतो. तर, यासाठी त्याने लाखो डॉलर्स खर्च केले आहेत.
१८ वर्षांचा तरुण बनण्याची जिद्द
ब्रायन जॉनसन (Brian Johnson) असं या व्यक्तीचे नाव आहे. वृद्धत्वापासून वाचण्यासाठी त्यांनी आपली कंपनीदेखील ८० कोटी डॉलरला विकली आहे. एका मुलाखतीतच त्याने हा खुलासा केला आहे. जॉनसनच्या म्हणण्यानुसार, ते विविध आरोग्य उपकरणांचा वापर करतो. तर, रोज शेकडो गोळ्यांचे सेवन करतो. त्याच्या शरीरातील सर्व अवयव १८ वर्षांच्या एका तरुणासारखे असावेत. उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी मी काहीही करु शकतो, असं त्याने म्हटलं आहे.
मुलाचे रक्त चढवले
जॉनसनला तरुण दिसण्याच्या वेडेपणाने इतके झपाटले आहे की त्याने स्वतःला मुलाचे रक्त चढवले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, असं केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहिल.
तरुण दिसण्यासाठी ४० लाख डॉलर खर्च
तरुण बनण्याची ही इच्छा खूप जास्त खर्चिक ठरली आहे. जॉनसनने त्याच्या या पूर्ण प्रयत्नाला ब्लूप्रिंट असं नाव दिलं आहे. या पूर्ण प्रोजेक्टसाठी त्याने आत्तापर्यंत ४० लाख डॉलरहून अधिक खर्च केले आहेत. ब्लूप्रिंटच्या या प्रोजेक्ट अंतर्गत सर्व निर्णय जॉन्सनचे डॉक्टर घेतात. तर, जॉन्सनदेखील या नियमांचे कठोरपणे पालन करतात. त्यांच्यासाठी एक पौष्टिक आहार देखील तयार करण्यात आला आहे.