शिर्डी : ओबीसी समाजातील काही अविवेकी नेत्यांच्या वक्तव्यामुळे मराठा अन इतर समाजात तेढ निर्माण होत असून मराठा कुणबी आरक्षणास विरोध करणे घटनाबाह्य आहे, असे परखड मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे (Rajendra Kondhare) यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा, युवा उद्योजक, शेतकरी व विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन शिर्डी येथे करण्यात आले होते. त्यावेळी कोंढरे अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश देशमुख, उपाध्यक्ष विनायक पवार, वसंतराव मुळीक, राष्ट्रीय खजिनदार प्रमोद जाधव, राष्ट्रीय चिटणीस गुलाब गायकवाड, युवा प्रतिनिधी आतिष गायकवाड, अमोल निकम, उत्तर महाराष्ट्र संघटक लालूशेठ दळवी, नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकात बनकर, नाशिक महिला अध्यक्ष अस्मिता देशमाने, धाराशिव महिला अध्यक्ष रेखा लोमटे, युवक सरचिटणीस योगेश पाटील, मंगेश निकम, किशोर गिराम, अमोल पवार आदी उपस्थित होते.
भारतीय राज्यघटनेच्या आधारे निर्माण झालेला आरक्षण कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या इंद्रा सहानी खटल्याच्या आधारे निर्माण झालेला राज्य मागासवर्ग आयोगाच्या तरतुदीच्या आधारे आरक्षण धोरण राबविले जाते. या दोन्ही तरतुदींचा आधार न घेता ज्यांनी ओबीसीतील अतिरिक्त आरक्षण अगोदरच बेकायदेशीर व्यापलेले आहे त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणास व कुणबी प्रमाणपत्रास विरोध करणे ही भुमिका घटनाबाह्य व कायद्याचा अवमान करणारी आहे. दोन्ही समाज घटकांनी सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. समाजा समाजात तेढ निर्माण करणे योग्य नाही. सोशल मीडियावरील अविवेकी तेढ वाढवणाऱ्या पोस्ट टाळल्या पाहिजेत. हे त्यांना स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवणार आहे, याचा रोडमॅप जाहीर करावा. मराठा समाजाने यापुढे ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास या तीन सूत्रांवर आधारित क्रियाशील व्हावे लागेल.
एके काळी ग्रामीण अर्थव्यवस्थेत ३० ते ५० टक्के वाटा व स्थान असलेल्या मराठा समाजाला आज राज्याच्या आर्थिक व्यवस्थेत ३ टक्के पर्यंत खाली येण्याची कारणे शोधून त्यावर ते स्थान पुन्हा मिळविण्यासाथी काम करावे लागेल.
राज्याच्या विकासात प्रकल्पासाठी कवडीमोल दराने जमिनी घेतल्या. इथला इतिहास घडवताना देशाचे संरक्षण करताना ज्या समाजाने त्याग केला, आरक्षणाचे धोरण ज्यांनी निर्माण केले, त्या समाजातील दुर्बलांसाठी सर्व समाजाने आता एकत्र उभे राहणे गरजेचे आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी, सरचिटणीस प्रकाश देशमुख, संयुक्त चिटणीस गुलाब गायकवाड, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष प्रकाश निर्मळ, दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाजी डौले, सरचिटणीस रमेश बोरूडे, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, प्रमोद जाधव, अतिष गायकवाड, राहुरी तालुकाध्यक्ष दिनकर पवार, संगमनेर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वराळ, अकोले तालुकाध्यक्ष भानुदास गायकर, कोपरगाव तालुकाध्यक्ष ऋषिकेश पवार, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुजित ढोकचौले, राहता तालुकाध्यक्ष रवीराज देसले, विलास वराळ, योगेश निकम, अनिकेत सदाफळ, सुमित निर्मल, अपासाहेब ढोकणे, ऋषिकेश भोसले, बापूसाहेब तनपुरे, विकी गायकवाड, सचिन मुजगुले, निलेश शेजवळ, बंटी नेरपगारे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी विशेष मेहनत घेतली.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra