मुंबई : मुंबई शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२४ साठी मतदार नोंदणी सुरु करण्यात आली असून मतदार नोंदणी करताना फॉर्म क्रमांक १९ भरणे अनिवार्य केले असल्याचे ग्रेटर बॉम्बे टीचर असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य विना अनुदानित व अनुदानित शाळा कृती समिती मुंबईचे अध्यक्ष संजय सुंदरराव डावरे यांनी सांगितले. निवडणूक आयोगामार्फत सदर फॉर्म भरण्याबाबत काही सूचना आणि बदल केले आहेत.
१. निवडणूक आयोगामार्फत शिक्षक मतदार संघाची मतदार यादी पुन्हा एकदा नव्याने तयार केली जाणार आहे. आधी नोंदवलेली सर्व नावे रद्द करण्यात आली आहेत.
२. मुंबईत राहणारे माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन व तंत्रविद्यालये व तत्सम संस्थांचे तसेच विद्यापीठांचे शिक्षक मतदार होऊ शकतात. त्यांची शाळा / कॉलेज किंवा संस्था / वर्क प्लेस त्याच मतदार संघात असण्याची आवश्यकता नाही. उदा. मुंबई बाहेरील शाळांमध्ये शिकवणारे मात्र मुंबईत राहणारे शिक्षकही मुंबई शिक्षक मतदार संघाचे मतदार होऊ शकतात.
३. शिक्षक मतदार संघाच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी कोणत्याही पूर्णवेळ शिक्षकाला मागणी करता येईल. शिक्षकाची नेमणूक रेग्युलर किंवा ॲडव्हॉक बेसिसवर असेल तरी सुद्धा चालेल. मागील सहा वर्षातील कोणतीही किमान तीन वर्षे ज्यांनी एका शाळेत किंवा एका पेक्षा अधिक शाळेत शिक्षक म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे. परमनंट असण्याची आवश्यकता नाही.
४. अनुदानित किंवा विनाअनुदानित किंवा सेल्फ फायनान्स अशा कोणत्याही शाळेत / शिक्षण संस्थेत / कॉलेजात / ज्युनिअर कॉलेजात / माध्यमिक पेक्षा कमी नसलेल्या कोणत्याही अभ्यासक्रमाच्या संस्थेत काम करणारे शिक्षक मतदार होऊ शकतात.
५. मागील तीन वर्षात सेवानिवृत्त झालेले शिक्षकही मतदार नोंदणीस पात्र आहेत. (मागील सहा वर्षात किमान तीन वर्ष त्यांची सेवा झालेली असणे आवश्यक आहे.) १ नोव्हेंबर २०२१ नंतर सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक व शिक्षक मतदार नोंदणी करू शकतात.
६. अर्ज नमुना १९ आपल्या मतदार नोंदणीसाठी भरावा. शक्यतो इंग्रजी फॉर्म भरावा आणि CAPITAL Letters चा वापर करावा. शाळा / कॉलेज यांचे मुख्याध्यापक /प्राचार्य यांच्या सही शिक्क्यानिशी फॉर्मसोबत असलेले प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
७. मुख्याध्यापकांनी स्वतःच्या फॉर्मवर अर्जदार म्हणून व मुख्याध्यापक (Head of Institution) म्हणून स्वतःच सही करावी.
फॉर्म – १९ भरताना लागणारी आवश्यक कागदपत्रे
अर्जदार शिक्षकाचा पासपोर्ट साईज फोटो.
मागच्या बाजूला पाढरी पार्श्वभूमी असणे आवश्यक आहे. फोटोत दोन्ही कान दिसणे आवश्यक आहे. हाच फोटो मतदार यादीत येणार आहे. White Background and Front Facing Passport Size (4.5’’ x 3.5’’) Photo.
अर्जात नमून केलेल्या पत्त्याच्या रहिवासी दाखल्यासाठी खालीलपैकी एक कोणताही पुरावा जोडावा.
आधारकार्ड झेरॉक्स (Self Attested)
किंवा
मतदार ओळखपत्र झेरॉक्स (Self Attested)
किंवा
पासपोर्ट झेरॉक्स (Self Attested)
किंवा
ड्रायव्हिंग लायसन्स झेरॉक्स (Self Attested)
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra