नवी दिल्ली: मायदेशात भारतासाठी २०११मधील विश्वचषकात प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट ठरलेल्या युवराज सिंह(yuvraj singh) भारतीय संघाला गुरूमंत्र दिला आहे. त्यांच्यामते संघातील प्रत्येक सदस्याला आगामी विश्वचषक २०२३ जिंकण्यासाठी दबाव सांभाळावा लागेल. आपल्या शरीराला खेळात झोकून द्यावे लागेल तसेच आपले सर्व काही द्यावे लागेल. भारताने आयसीसी स्पर्धा जिंकून दहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. भारताने शेवटचा २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब जिंकला होता.
युवराज सिंहने टीम इंडियाला केले सावधान
युवराजने आयएएनएसशी बोलताना सांगितले की आम्हाला आयसीसीची ट्रॉफी जिंकून खूप काळ लोटला आहे. आम्ही २०२१ आणि २०२३मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे फायनल सामने खेळलो. मला वाटते संघातील काही लोकांचा हा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो. हा वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रत्येकाला आपले शरीर हे झोकून द्यावे लागेल. तसेच सगळे काही पणाला लावावे लागेल.
भारतासाठी धोकादायक ठरू शकतात हे संघ
१९८३ आणि २०११मधील विजेता भारतीय संघ आपल्या वर्ल्डकप अभियानाची सुरूवात ८ ऑक्टोबरला चेन्नईच्या एम ए चिदम्बरम स्टेडियममध्ये पाच वेळा विजेता ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे संघ वर्ल्डकपमध्ये भारतासाठी मोठे आव्हान निर्माण करू शकतात.
ऑस्ट्रेलिया नेहमीच एक मजबूत संघ राहिला आहे. त्यांनी याआधी अनेक खिताब जिंकलेत. त्यांच्यात दबावाच्या सामन्यात जिंकण्याची क्षमता आहे. मला असेही वाटते की न्यूझीलंड एक चांगला संघ आहे. तर इंग्लंडचा संघ चांगला एकदिवसीय संघ आहे. द. आफ्रिकेचा संघही चांगली कामगिरी करत आहे.
गोलंदाजांचे योगदान महत्त्वाचे
युवराजच्या मते सामना जिंकण्यासाठी गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरेल. यातच स्पिनर महत्त्वाची भूमिका निभावतील.