Saturday, July 20, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023World Cup 2023 : भारत-इंग्लंड यांच्यात शनिवारी रंगणार सामना, जाणून घ्या सर्व...

World Cup 2023 : भारत-इंग्लंड यांच्यात शनिवारी रंगणार सामना, जाणून घ्या सर्व काही

नवी दिल्ली: २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकाचे(world cup 2023) बिगुल वाजले आहे. क्रिकेटच्या या महाकुंभाला ५ ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. मात्र वॉर्म अप सामने शुक्रवारपासूनच सुरू होत आहेत. आता शनिवारी म्हणजेच उद्या ३० सप्टेंबरला भारत आणि इंग्लंड यांच्यात वॉर्मअप सामने खेळवले जाणार आहेत.

या सामन्यात दोन्ही संघ आपल्या बेस्ट प्लेईंग इलेव्हनसह मैदानात उतरणार आहेत. दोन्ही संघांकडे विश्वचषकसाठी आपले बेस्ट प्लेईंग ११ निवडण्याची चांगली संधी आहे.

वॉर्मअप सामन्यात सर्व १५ खेळाडूंचा वापर केला जाऊ शको. दरम्यान फलंदाजी ११ खेळाडू करतील मात्र प्लेईंग इलेव्हन निवडण्याची गरज नाही. कोणीही फलंदाजी करू शकतो आणि कोणीही गोलंदाजी करू शकतो.

पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता

हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुवाहाटीत ३० सप्टेंबरला पावसाची दाट शक्यता आहे. weather.comच्या रिपोर्टनुसार शनिवारी गुवाहाटीमध्ये ५०-५५ टक्के पावसाची शक्यता आहे.

कधी आणि कुठे खेळवला जाणार सामना?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा वॉर्म अप सामना गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये खेळवला जाईल. सामन्याला दुपारी २ वाजल्यापासून सुरूवात होईल.

२०२३ वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

२०२३ वनडे वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचा संघ- जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस एटकिंसन, जानी बेयरस्टा, सॅम कर्रन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, हैरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टॉपले, डेविड विली, मार्क वुड, क्रिस वोक्स.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -