Wednesday, August 27, 2025

VIDEO: शाळेत अभ्यास करताना अचानक मुलीला आला हृदयविकाराचा धक्का

VIDEO: शाळेत अभ्यास करताना अचानक मुलीला आला हृदयविकाराचा धक्का

नवी दिल्ली:एक काळ असा होता की केवळ वयस्कर आणि म्हाताऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका येत असे. मात्र गेल्या काही वर्षांत लहान वयातच हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले आहे. अभ्यासाच्या वाढत्या ओझ्याने ही समस्या अधिक वाढली आहे.

नुकतेच एक प्रकरण गुजरातच्या सूरत येथून समोर आले आहे. येथील आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा क्लासमध्ये लेक्चर सुरू असताना मृत्यू झाला. असे मानले जात आहे की मृत्यूचे कारण हार्ट अॅटॅक आहे. तातडीने या मुलीला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिचा जीव वाचू शकला नाही. या घटनेने तिच्या कुटुंबातील व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे.

सीसीटीव्हीमध्ये कैद झाली घटना

 

शाळेच्या परिसरात प्रत्येक क्लासरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की विद्यार्थिनी लेक्चर सुरू असतानाच बेशुद्ध होते. ती आपल्या बेंचवर पडते.

यानंतर क्लासमध्ये एकच गोंधळ झाला. शिक्षकांनी या विद्यार्थिनीला उठवण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या डोळ्यांवर पाणीही मारले. मात्र याचा काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Comments
Add Comment