Thursday, March 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray : अन्याय दिसेल तिथे लाथ बसलीच पाहिजे!

Raj Thackeray : अन्याय दिसेल तिथे लाथ बसलीच पाहिजे!

मराठी महिलेला घर नाकारल्यानंतर राज ठाकरे उतरले मैदानात

मनसैनिकांना दिला थेट आदेश

मुंबई : मुंबईतील मुलुंडमध्ये (Mulund) मराठी (Marathi) महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारल्याच्या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात असे पुन्हा घडले तर गालावर वळ उठतील हे निश्चित,” असा इशारा त्यांनी दिला. सोबतच “अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे,” असे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले आहे.

मुलुंडमधील एका इमारतीत तृप्ती देवरुखकर या महिलेला मराठी असल्याने ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली होती. त्यांनी संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता, जो तुफान व्हायरल झाला.

तृप्ती यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसैनिक मुलुंडमधील संबंधित इमारतीत पोहोचले. जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्राला तृप्ती यांची माफी मागायला लावली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क केला. त्यानंतर तृप्ती देवरुखकर यांनी बुधवारी रात्री उशिरा मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलुंड पोलिसांनी यातील दोन्ही आरोपी प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर यांना रात्री ताब्यात घेतले.

या संपूर्ण प्रकरणावर राज ठाकरे यांनी ट्वीट करुन प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहितात की, “मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असे काही घडले तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचे मनापासून अभिनंदन. तुमचे कायम लक्ष असतेच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झाला तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असेच सुरु राहिले पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे!

दरम्यान या सगळ्या प्रकारातील पीडित महिला तृप्ती देवरुखकर या राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आज शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. इथे त्या शर्मिला ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समजते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -