Nitesh Rane : मराठी माणसाच्या भविष्याचा खून करून स्वतःच्या अंगावर बरबटलेलं रक्त आधी पुसा...

  85

नितेश राणे यांचा संजय राऊतांवर पलटवार


मुंबई : मुंबईतील मुलुंडसारख्या ठिकाणी केवळ मराठी असल्यामुळे तृप्ती देवरुखकर (Trupti Deorukhkar) यांना ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली ही बाब आता सर्वच राजकीय पक्षांनी (Political Parties) उचलून धरली आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशीच सर्वांची भूमिका आहे. मात्र, उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी या घटनेला भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जबाबदार धरत गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीदेखील त्यांच्यावर पलटवार केला आहे.


नितेश राणे म्हणाले, मुलुंड घटनेला जबाबदार भाजप आणि शिंदे आहेत असं बोलण्याअगोदर संजय राजाराम राऊतला लाज वाटली पाहिजे. मुंबईतला मराठी माणसाचा टक्का का घसरला? इतकी वर्षे महापालिकेत उद्धव ठाकरे यांची सत्ता होती ना? मग तरीही मुंबईतला मराठी माणूस आज मीरा रोड, वसई, विरार, भाईंदर, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी का राहायला गेला? मुंबईमध्ये त्यांना का घर घ्यावंसं वाटलं नाही? का त्याला आर्थिक सक्षम केलं नाही? का वडापावच्या गाडी पुरतं ठेवलं? असे प्रश्न उपस्थित करत नितेश राणे यांनी संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला.


पुढे नितेश राणे म्हणाले, पत्राचाळमध्ये काय मराठी माणसं राहत नव्हती? खंबाटा आणि एअर इंडियामध्ये मराठी कामगार काम करत नव्हते का? मग त्याला जबाबदार कोण आहे? स्वतःच्या अंगावर मराठी माणसाच्या भविष्याचा खून करून बरबटलेलं जे रक्त आहे ते आधी पुसा आणि मग भाजप आणि शिंदे साहेबांवर बोट ठेवा, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता भुयारी बोगद्याचा मार्ग मोकळा

मुंबई: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा

मातोश्रीकडे डुप्लिकेट शिवसेना

मुंबई : खरी शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे डुप्लिकेट शिवसेना आहे. त्यांनी अडीच

राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान - एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून, संबंधित

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - अजित पवार

मुंबई : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातले सरकार शेतकऱ्यांचेच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी

शासकीय कार्यालयात 'बर्थडे केक' कापणाऱ्यावर होणार कारवाई

मुंबई : शासकीय कार्यालयात आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, सेल्फी, फोटोसेशन करणे महागात

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव, कारवाईची मागणी

विधान परिषदेत शिवसेना आमदाराने उठवला मुद्दा, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आश्वासन मुंबई : महाराष्ट्राची