सिन्नर : दातली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आजी-आजोबा दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या वतीने आजी आजोबांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आजी आजोबा विषयी मनोगत व्यक्त केले तसेच आजी आजोबांचे औक्षण व पाद्यपूजन आणि दर्शन घेतले. त्यानंतर संगीत खुर्ची स्पर्धा, चमचा लिंबू स्पर्धा, बकेट मध्ये चेंडू फेकणे आदी खेळांचा आजी आजोबांनी मनमुराद आनंद लुटला.
औक्षण व पाद्य पूजन करताना काहींना गहिवरून आले. मनोगत व्यक्त करताना आम्ही आमच्या शालेय जीवनात गेल्याचा भास झाला असेही काहीजण म्हणाले. मुलांना असेच संस्कार देत चला, शाळेसाठी काही कमतरता भासल्यास आम्ही नक्कीच पुर्ण करण्याचा प्रयत्न करू असे म्हणत शिक्षकांचे आभार मानले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. शाळेतील शिक्षक अमृत नांद्रे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
“शाळेतील अनुभव व आजी-आजोबांचे अनुभव त्यांच्या हितगूजमधून मिळणारी माहिती, गोष्टी पाल्यांच्या जडणघडणीसाठी पोषक ठरतात. त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी-आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ व गप्पागोष्टी, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ओळख व्हावी, यासाठी आजी-आजोबा दिवस शाळेत साजरा करण्यात आला.”
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…