Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

वाडा शहरातील गणेशघाट येथे गणरायाचे विसर्जन

वाडा शहरातील गणेशघाट येथे गणरायाचे विसर्जन

वाडा(वार्ताहर): राज्यभरात अनंत चतुर्दशीला मोठा उत्साह पाहायला मिळाला. गणेशभक्तांनी मोठ्या भक्तिभावाने साश्रूनयनांसह आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला. वाडा शहरातही मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.


शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाच्या विसर्जना पूर्वी वाड्यातून मोठ्या भक्ती भावाने, नाचत गाजत मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान भाजपाचे उपजिल्हाअध्यक्ष संदीप पवार यांनी सर्व मंडळावर पुष्पवृष्टी करून गणेश भक्तांचे स्वागत केले. दहाव्या दिवशी एकूण ११ सार्वजनिक मंडळाच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले.


या प्रसंगी वाडा पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवल्याने विसर्जनाचा हा सोहळा मोठ्या शांततेत पार पडला.

Comments
Add Comment