
गुहागर: राज्यात सगळकडेच गणपती विसर्जनाची धामधूम सुरू आहे. त्यातच रत्नागिरीच्या गुहागरमध्ये एक विचित्र अपघात घडला. येथील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत अचानक ब्रेक फेल झालेला टेम्पो घुसला.
संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास ही घटना घडली. या विचित्र अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले. गुहारच्या पाचेरी आगर गावात ही दुर्घटना घडली.
या पाचेरी आगार गावात रस्त्यावरून संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू होते. गणेशभक्त नाचत-गात आपल्या बाप्पाला निरोप देत होते. त्याचवेळेस पिक अप टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने हा टेम्पो या मिरवणुकीत घुसला. य
या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दीपक भुवड आणि कोमल भुवड अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर ९ जण जखमी झाले.
या घटनेनंतर जखमी व्यक्तींना तातडीने रुग्णालयात नेले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. यापैकी तीन जणांना उपचारानंतर सोडण्यात आले. तर ४ जणांची प्रकृती गंभीर आहे.