राज्यात एक वर्षापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यानंतर हिंदूच्या सणांना प्रोत्साहन देण्याची जाहीर भूमिका घेतली होती. सणांचा आणि सरकारचा काय संबंध असे त्यावेळी अनेक जणांना वाटले असावे; परंतु वर्षाचा काळ लोटल्यानंतर सरकारकडून जर नागरिकांना त्यांचा आनंद साजरा करणाऱ्या उत्सवात सहकार्य मिळाले, तर त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळतो. मुंबई-ठाण्यात गोपालकालाचा उत्सव मोठा असतो. उंच उंच दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा लागतात. हंडी फोडताना थरावरून पडलेल्या गोविदांच्या अपघाताचा खर्च, तसेच दुर्दैवी मृत्यूची घटना घडल्यास त्याच्या कुटुंबावर आघात कोसळतो. या गोंविदांचा विमा उतरावा अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती; परंतु आधीच्या सरकारला ती आपली जबाबदारी नाही, असे वाटत होते. मात्र, महायुती सरकारने पहिल्यांदाच सर्व गोविंदांचा मोफत विमा उतरविण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर यंदाच्या गणेशोत्सव काळात सार्वजनिक उत्सव मंडळावरील ज्या जाचक अटी होत्या, त्या शिथिल करण्याचा राज्य सरकारकडून जो निर्णय घेण्यात आला त्याचे सर्व मंडळांनी स्वागत केले. राज्य सरकारच्या या नव्या निर्णयामुळे स्वत:च्या खिशातील पैसा टाकून उत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सव मंडळांना कळविण्यात आले की, एकदा यावर्षी जी उत्सवाची परवानगी घेणार आहात ती पुढील पाच वर्षे कायम राहणार आहे. त्यातून वर्गणी काढून उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा त्रास कमी व्हावा यादृष्टीने सरकार पाहत आहे, हे त्यातून दिसून येते. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे यंदाच्या गणेशोत्सवात सर्वत्र उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मंडळाचा कारभार हा कार्यकर्त्यांच्या फळीवर अवलंबून असतो. यंदा या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसला. ‘सरकार आपल्या दारी’ हा कार्यक्रम महायुतीच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यांत करताना जिल्ह्यातील नागरिकांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यास सरकार कसे कटिबद्ध आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न होत आहे. त्याप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाचे कार्यकर्ते अणि पदाधिकारी यांना शासकीय परवानगी घेताना तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी महायुतीच्या सरकारने काळजी घेतली आहे. त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्ते खूश असल्याचे दिसून आले.
खरंतर अनंत चतुदर्शी या दिवसाचे पौराणिक कथेनुसार वेगळे महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. त्यानंतर अनंत सूत्र किंवा अनंत हातात बांधले जाते. स्त्रिया डाव्या हाताला आणि पुरुष उजव्या हातात अनंत घालतात. हे अनंत सूत्र दीर्घ आयुष्य आणि शाश्वत जीवनाचे प्रतीक मानले जाते. मात्र, अाध्यात्मिक क्षेत्रातील उपासक किंवा देवाच्या साधनेत असलेल्या व्यक्तींना अनंत चतुदर्शी या दिवसाचे महत्त्व असले तरी, हा दिवस गणेश विसर्जनाचा सर्वात मोठा दिवस अशी लौकिकता मुंबईसह महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. त्यामुळे अनंत चतुदर्शीच्या दिवशी मुंबई, पुणे शहरात विसर्जन मिरवणुकीचा एक आगळा-वेगळा आनंदोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. त्यामुळे नव्या तरुण पिढीला या दिवसाचे महत्त्व विचारले तर गणेश विसर्जन मिरवणूक हीच डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहणार नाही. आबालवृद्धांपासून भाविक रस्त्याच्या दुतर्फा ही मिरवणूक पाहतात. विसर्जन मिरवणुकीत होणारी ही गर्दी लक्षात घेऊन पोलिसांकडून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे. पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. गणेश विसर्जनाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय मुंबईत होमगार्डस, विविध स्वयंसेवी संस्था, पोलीस मित्रांची मदतदेखील घेतली जात आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही मोठी गर्दी होणार असल्याचा अंदाज आहे. त्यासाठीदेखील मुंबई पोलिसांकडून लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे. फक्त मुंबई शहरातील विसर्जन मिरवणुकीचा विचार केला तरी, मुंबई पोलीस दलाकडून २८६६ पोलीस अधिकारी आणि १६ हजार २५८ पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. यामध्ये आपल्या दालनात बसून कार्यरत असलेले ८ अप्पर पोलीस आयुक्त, २५ पोलीस उपायुक्त, ४५ सहायक पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरणार आहेत. त्याचबरोबर ३५ एसआरपीएफ पलटन, क्यूआरटी पथक, दंगल नियंत्रण पथक, होमगार्डस देखील बंदोबस्तासाठी असणार आहेत. मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, मार्वे, अक्सा या प्रमुख विसर्जन स्थळांसह ७३ नैसर्गिक ठिकाणांव्यतिरिक्त १६० हून अधिक कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मुंबईतील उत्सवाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरणगावात विसर्जनाच्या दिवशी मोठी गर्दी उसळते. ही बाब लक्षात घेता लालबाग-परळ भागात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई पोलिसांची करडी नजर आहे. केवळ लालबाग-परळ भागात ३०० सीसीटीव्हींची सोय केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी सहा छेडछाडविरोधी पथक तैनात करण्यात आले आहे. मोबाइल चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी ६ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. मुंबईला दहशतवादाचा असलेला धोका पाहता दहशतवादी विरोधी पथकाची एक टीमदेखील तैनात असणार आहे. या सर्व बाबींचा विचार केला तर राज्य सरकारने आपल्या कुटुंबाची जशी काळजी घ्यायला हवी तशी यंदा मंडळाची काळजी घेताना सरकार दिसले. बाप्पाच्या या आनंदाच्या उत्सवात महाराष्ट्रात पाऊस चांगला पडल्याने शेतकरी राजाही समाधान व्यक्त करत आहे. भगवान विष्णूचे स्थान असलेल्या समुद्रात गणरायाला निरोप देण्यासाठी लाखोंची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. या गर्दीतील भाविकांच्या सकारात्मक ऊर्जेतून महाराष्ट्र सुफलाम होवो, अशी प्रार्थना करूया.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…