
मोबाईल असाच कुठेही ठेवताय? जरा जपूनच...
सिडको : उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका घरात मोबाईलचा स्फोट होऊन कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. त्यात एकाची तब्येत गंभीर असून जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्फोट नेमका कसा झाला, याचा अधिक तपास करत आहेत.
मोबाईलच्या या स्फोटामुळे मोठी आग भडकून घराचे नुकसान झाले. घरातील काही साहित्य जळून खाक झाले. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, यामुळे घराबाहेरील गाड्यांच्या काचा फुटल्या, आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या. त्यामुळे परिसरात काहीशी घबराहट देखील पसरली. तुषार जगताप, शोभा जगताप, बाळकृष्ण सुतार अशी या घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत. यासंबंधी अधिक तपास सुरु आहे.